ओटवणे प्रतिनिधी
Aradhya Raul first in the brain development exam in the district!
राष्ट्रीय पातळीवरील ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मूळची सांगेली येथील आणि सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं २ शिकत असलेली कु. आराध्या अमित राऊळ या विद्यार्थिनीने ९३ गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. कु आराध्या राऊळ इयत्ता चौथीत शिकत असून या यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. कु आराध्या राऊळ सांगेली येथील देवस्थानचे मानकरी पंढरीनाथ पुनाजी राऊळ यांची नात आहे. तिला अंकिता काजरेकर तसेच वर्गशिक्षिका फाले व मुख्याध्यापिका खानोलकर तसेच प्रशालेचे सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.









