सिनेमा , हॉटेल व राहण्याची सोय असलेले सिंधुदुर्गातील पहिलेवहिले थिएटर
सावंतवाडी प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गाने झाराप झिरो पॉईंट येथे नव्याने उभारलेल्या आराध्य सिनेमा या थिएटरचा शुभारंभ १ सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर व उद्योजक शैलेश पै यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर सल्लागार अशोक सारंग ,आर्किटेक साहस पाटील ,आकेरी सरपंच महेश जामदार,आदी उपस्थित राहणार आहेत.
सावंतवाडी, कुडाळ ,वेंगुर्ला तालुक्यासह बांदा, शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई -गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठीकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल हॉटेल राहण्याची व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार असल्याचा विश्वास निरज देसाई यांनी व्यक्त केला.
श्री देसाई म्हणाले, शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११. वाजता आराध्य सिनेमा चा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पर्ई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुळात सावंतवाडी ,वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अशा सिनेमा थिएटरची कमतरता श्री पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा उपलब्ध आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सर्व सुविधांयुक्त एकाच ठिकाणी जेवण, राहण्याची व चित्रपट पाहण्याची सोय असणाऱ्या आराध्य सिनेमागृह हॉटेल्स ची संकल्पना पहिली वहीली आहे. जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित दर्शवावी असे आवाहन उदय पारळे मित्र मंडळ च्या वतीने नीरज देसाई यांनी केले आहे.









