प्रतिनिधी/ बेळगाव
आदर्शा ग्रुप कन्सर्नतर्फे मारुती गल्ली, बेळगाव येथील आराधना सारीज, ड्रेस मटेरियल व फॅन्सी किड्स कलेक्शनतर्फे ए-वन सेलला प्रारंभ झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाववासियांच्या सेवेत असलेले व अत्यंत विनम्र सेवा देणारे प्रसिद्ध वस्त्रदालन म्हणजे आराधना साडी कलेक्शन होय. या ठिकाणी अत्यंत वाजवी दरामध्ये ‘लेटेस्ट प्राईज गॅरंटी योजनेद्वारे लोवेस्ट प्राईज गॅरंटी’मध्ये ए-वन कलेक्शनचे अत्यंत टिकाऊ दर्जाचे रेडिमेड गार्मेंट्स उपलब्ध आहेत.
स्त्रियांकरिता फॅन्सी ते सिल्क साडी तसेच ड्रेस मटेरियल्स, फॅन्सी कुर्तीज, कुर्ती सेट्स, टॉप्स, जिन्स, तर पुरुषांसाठी शर्ट्स, टी-शर्ट्स, जीन्स, ट्राऊजर्स, कुर्ता सूट, लहान मुलांसाठी बाबा सूट, फ्रॉक्स असा भरपूर स्टॉक्स उपलब्ध आहे.
या सेलमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी सर्व प्रकारच्या समारंभांसाठी योग्य असे तसेच नियमित वापरासाठी रेडिमेड गार्मेंट्स उपलब्ध आहेत. भेट किंवा आहेर देण्यासाठीसुद्धा रेडिमेड गार्मेंट्स उपलब्ध असून हा सेल मोजक्याच दिवसांसाठी आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत एक वेळ भेट देऊन बेळगावकरांनी या सेलचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.









