वृत्तसंस्था/नवी दिल्ली
शारजामध्ये होणाऱ्या नेपाळ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विंडीज संघाच्या कर्णधारपदी अष्टपैलु अकिल हुसेनची नियुक्ती करण्यात आली आहे. या मालिकेसाठी विंडीज क्रिकेट मंडळाने संघाचे अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नियमीत कर्णधार शॉय हॉप, अलझारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर फॅबीयन अॅलेन, जेसन होल्डर आणि कायली मेयर्स यांना मात्र या दौऱ्यासाठी संघात निवडले आहे. ही मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अकिम ऑगेस्टी, अष्टपैलु नवीन बिडासी, फिरकी गोलंदाज झिशान मोटारा, रेमन सिमॉन्स आणि अमिर जंगू यांचे या मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण राहील.
विंडीज संघ : अकिल हुसेन (कर्णधार), अॅलेन, अँड्रीव, ऑगेस्टी, नवीन बिडासी, जेदा ब्लेड्स, कार्टी, करिमा गोरे, जेसन होल्डर, अमिर जंगू, काईल मेयर्स, मॅकॉय, झिशान मोटेरा, रेमन सिमंड्स आणि शमार स्प्रिंगर.









