महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही
बेळगाव : एप्रिल महिण्यातील गृहलक्ष्मी योजनेचा हप्ता पुढील आठवड्याच्या आत महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. मार्च महिन्यातील गृहलक्ष्मी योजनेचा हप्ता वाटप करण्यात विलंब झाला असून त्याचे मुख्य कारण मार्चअखेर (आर्थिक बंदी) असल्याकारणाने करता आले नाही, तथापि एप्रिल महिण्याचा योजनेचा हप्ता तयार असून त्याचे वाटप टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. याबद्दल काँग्रस पक्षाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्याशी बैठकीनंतर त्या बोलत होत्या. “खर्गे हे आमच्या पक्षाचे खंबीर व्यक्तिमत्त्व आहेत. आपण त्यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी भेट घेतली होती. यावेळी अध्यक्षांनी मला गृहलक्ष्मी योजनेला पात्र महिलांच्यापर्यंत पैसे पोहचत आहेत का? असा प्रश्न विचारला त्यावर सविस्तर चर्चा केल्याचे त्या बोलल्या.”









