ग्रामस्थांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी
बेळगाव : नंदिहळ्ळी येथील कलमेश्वर मंदिर (शिवमंदिर) हे अत्यंत जुने असल्याने जीर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन मंदिराच्या बांधकामासाठी आमदार निधीतून 40 लाख रुपये मंजूर करावेत, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ व अॅड. मारुती कामाण्णाचे यांच्यावतीने महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवारी देण्यात आले. कलमेश्वर मंदिर हे पुरातन असून, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मंदिर जीर्ण झाले आहे. मंदिराच्या नवीन उभारणीसाठी मंत्री हेब्बाळकर यांनी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी निवेदन स्वीकारून मंदिरासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन मंत्री हेब्बाळकर यांनी दिले. यावेळी अॅड. मारुती कामाण्णाचे, विजय सांबरेकर, अमित कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.









