पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
खानापूर : खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, रफिक वारीमणी, अप्पय्या कोडोळी यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची शनिवार दि. 22 रोजी बेळगाव येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार करून शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले.









