महाजनांची वार्षिक आमसभा : अध्यक्ष आनंद भाईडकर यांची माहिती,वर्षभरात दीड कोटी ऊपये देवस्थानात जमा तर 71 लाख खर्च,महाद्वार, मंदिर विस्तारीकरणाचा निर्णय
म्हापसा : म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानची वार्षिक आमसभा रविवारी होऊन त्यात संस्थानच्या हिशोबाला मान्यता देण्यात आली. या हिशोबात यंदाच्या जत्रोत्सवात 71 लाख 8625 ऊ.ची देणगी आली व 88 लाख 48279 ऊ.चे इतर उत्पन्न मिळून 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या काळात एकूण 1 कोटी 59 लाख 56904 ऊपये जमा झाले. त्यातील जत्रोत्सवासाठी 23 लाख 23583 ऊ. व वर्षभरातील इतर खर्च मिळून एकूण 71 लाख 6380 खर्च झाला आहे. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत देवस्थानकडे 88 लाख 50523 ऊ. जमा झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक ताळेबंदानुसार देवस्थानकडे एकूण 3 कोटी 81 लाख 50723 ऊपयांची मालमत्ता आहे. बँकेमध्ये 50 लाखांची कायम ठेव असून त्यावर 37 हजार 302 ऊ. व्याज जमा झाले आहे. त्याबरोबर सध्याची मालमत्ता 91 लाख 23 हजार 247 ऊ. देवस्थानकडे आहे. असे एकूण 5 कोटी 21 लाख 12 हजार 977 ऊं. श्री देव बोडगेश्वर संस्थानकडे आहे. स्टेट बँकमध्ये 11 लाख 36443 ऊ., आयडीएफसी बँकेत 1 लाख 8529 ऊ., युनियन बँकमध्ये 65 हजार, म्हापसा अर्बन बँकेकडे 11 लाख 41 हजार 755 ऊ., सारस्वत बँकमध्ये 11305 ऊ., कॉर्पोरेशन अर्थात युनियन बॅकमध्ये 89 लाख 68245 ऊ., असे एकूण 1 कोटी 69 लाख ऊ. रोख बँकेत आहेत. त्यात वाढ करण्याचा मनोदय यावेळी अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी व्यक्त केला.
देवस्थानकडे मोठ्या प्रमाणात सुवर्णालंकार
या व्यतिरिक्त देवस्थानकडे कॉर्पोस फंड 2 कोटी 27 लाख 11939 ऊ. आहे. यावर्षी सोन्याचा दंड, मशाल मिळून एकूण 2 कोटी 5 लाख 50508 ऊ.ची देणगी मिळाली आहे. श्री देव बोडगेश्वराला भाविकांनी खूप सोने अर्पण केल्याची माहिती भाईडकर यांनी दिली.
महाद्वार, मंदिर विस्तारीकरण करणार : अॅड. वामन पंडित
देवस्थानचे सरचिटणीस अॅड. वामन पंडित यांनी सांगितले की, वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 90 टक्के महाजनांनी आर्थिक खर्चाला मान्यता दिली. आमच्याकडे 88 लाख ऊ. आहेत त्याबाबत महाजनांनी सूचना केली. देवस्थानच्या सीएनी सांगितल्यानुसार ही रक्कम अशीच ठेवल्यास त्यावर 30 टक्के कर लागू लागतो. म्हणून ही रक्कम खर्च करण्याचा प्रश्न सभेसमोर ठेवला असता पणजी – म्हापसा रस्त्याजवळ महाद्वार व जत्रोत्सवात भाविकांची संख्या वाढत असल्याने मंदिर विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. तसेच अन्य काही गोष्टी करण्यासही महाजनांनी मान्यता दिल्याची माहिती अॅड. वामन पंडित यांनी दिली. नगसेवक सुधीर कांदोळकर यांनी देवस्थान परिसरात वैद्यकीय संस्था उभारण्याची मागणी केली. यामुळे श्री देव बोडगेश्वराचे नावही प्रसिद्ध होईल, असे ते म्हणाले. सरचिटणीस अॅड. वामन पंडित यांनी हा विषय पुढील वार्षिक बैठकीत ठेवून आचरणात आणण्याचा प्रयत्न कऊ असे सांगितले.
ऑडिट रिपोर्ट नसताना ताळेबंद कसा सादर केला? : विनोद फडके
श्री देव बोडगेश्वराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशोबाला मान्यता देण्यात आली मात्र बैठकीत ऑडिट रिपोर्ट नव्हता. कुठल्याही सीए ऑडिट रिपोर्टशिवाय अहवाल देता येत नाही. तसेच बॅलन्सशीट (ताळेबंद) कसा तयार कऊ शकतात? गेल्या तीन वर्षांपासून हाच प्रकार येथे घडत आहे. जो कोण सीए आहे त्याच्या विऊद्ध तक्रार व्हायलाच हवी. अध्यक्ष ऑडिट रिपोर्ट पुढच्या वर्षी सादर करतो असे सांगतात. ताळेबंद यावर्षीचा आणि ऑडिट रिपोर्ट पुढच्या वर्षी देणार, हे बरोबर नाही. देवस्थान सभागृहासाठी वर्षांकाठी 10 लाखाचे डिझेल खर्च करतात. देवस्थानकडे जनरेटर आहे, कोणी गाडीला डिझेल घालतो का? असा खर्च केला तर देवस्थानचे उत्पन्न कसे वाढणार? अॅड. वामन पंडित यांच्यामुळै यावर्षी देवस्थानकडे काहीतरी उत्पन्न दिसून आले. भाविक देवाला देणगी देतात, त्यामुळे देवासाठीच ते खर्च झाले पाहिजे. यापुढे 10 हजारांवरील खर्चासाठी निविदा काढण्याची सूचना विनोद (बाळू) फडके यांनी केली.
म्हापसा, काणकावासियांना महाजन करावे : संजय बर्डे
श्री देव बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा महाजन संजय बर्डे यांनी, म्हापसा तसेच काणका पसिरातील नागरिकांना महाजन करावे, जत्रेवेळी जागा देताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, देवस्थानकडील आर्थिक उत्पन्नापैकी काही पैसे हुषार होतकऊ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याची मागणी त्यांनी केली.









