व्हीआयच्या संचालक मंडळाचा 2,458 कोटी रुपयांच्या विक्रीस हिरवा कंदील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्होडाफोन आयडिया (व्हीआय) ने नोकिया आणि एरिक्सनला 2,458 कोटी रुपयांचा भागभांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी नियामक फाइलिंगमध्ये, व्हीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालक मंडळाने नोकियाला 10 रुपये दर्शनी मूल्याचे 102.7 कोटी समभाग आणि एरिक्सनला 63.37 कोटी समभाग देण्यास मान्यता दिली आहे. 14.8 रुपये प्रति समभागाच्या इश्यू किंमतीवर, नोकियाला 1,520 कोटी रुपयांचे समभाग मिळतील तर एरिक्सनला 938 कोटी रुपयांचे इक्विटी समभाग मिळतील.
व्हीआयने सांगितले की या प्राधान्य इश्यूनंतर कंपनीतील नोकिया आणि एरिक्सनचे शेअरहोल्डिंग 1.5 टक्के आणि 0.9 टक्के होईल. प्रवर्तक आदित्य बिर्ला ग्रुप आणि व्होडाफोन पीएलसी यांचा एकत्रित हिस्सा आता 37.3 टक्के असेल, तर केंद्राचा हिस्सा 23.2 टक्के असेल. उर्वरित 37.1 टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरहोल्डिंगकडे असेल.
व्हीआयच्या भागधारकांना आता प्रस्ताव मंजूर करावा लागेल आणि कंपनीने 10 जुलै रोजी स्टेक ट्रान्सफरचा विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंध्रा म्हणाले, ‘व्होडाफोन आयडिया 4 जी कव्हरेज विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांना 5 जी अनुभव देण्यासाठी योग्य गुंतवणुकीसह उद्योगाच्या विकासात भागीदार होण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले.









