सांगली :
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दोन डीपीआरला शासनाकडून मंजुरी मिळाली असून योजनेअंतर्गत महापालिकात १०२ घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. जास्तीत जास्त नागरिकांनी आवास योजनेचा लाभ घ्यावा, बांधकाम परवाने देण्याकरिता मनपा वतीने सर्व सहकार्य असणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी यावेळी सांगितले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे यापूर्वी १०२ लाभार्थीचे डी पी आर ला मान्यता मिळालेली आहे.
आता महानगरपालिकेकडून शासनाकडे मान्यतासाठी पाठवलेल्या ५७ आणि ५९ या डीपीआरला २ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यता मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर १०२ आणि ११६ लाभार्थीच्या मधील सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकाम परवाने प्राप्त करून त्यांचे घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आहे. ज्या लाभार्थीना बांधकाम परवाने काढण्यासाठी काही अडचणी असतील त्यांनी महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षाशी संपर्क साधण्याचा आहे.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी बांधकाम परवाने काढणे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकारी यांची एकत्रित कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून या कार्यशाळेसाठी मंजूर डीपीआर मधील लाभार्थ्यांनी आणि त्यांचे बांधकाम परवाने काढून देणारे इंजिनिअर यांनी त्यांच्या शंका आणि अडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आहे.
केंद्राच्या अंगिकार उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील बांधकाम परवाने तातडीने देण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांनी बांधकाम करिता आवश्यक सर्व कागदपत्रे आणि घरकुलाचा आराखडा तयार करून नगररचना विभागाकडे सादर करण्याचा आहे.
तसेच यापुढेही नवीन अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी आवास योजना कक्ष प्रमुख सागर शिंदे याच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी व ऑनलाईन अर्ज करून जास्तीत जास्त नागरिकांनी आवास योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यम गांधी यांच्याकडून करण्यात आलेले आहे








