70 एचटीटी-40 बेसिक टेनर विमानांसाठी 6,828 कोटी रुपयांचा करार
. वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 70 एचटीटी-40 बेसिक टेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली. हा करार 6,828 कोटी रुपयांचा असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच 3,108.09 कोटींमध्ये तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदी केली जाणार आहेत. एकंदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने 10 हजार कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी दिली आहे. नव्या प्रशिक्षण विमानांचा पुरवठा येत्या सहा वर्षात केला जाणार आहे. तसेच
एचटीटी-40 ची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) केली आहे. हे एक टर्बोप्रॉप विमान आहे. कमी गती राखण्याच्या हँडलिंग फिचर्ससह सुधारित प्रशिक्षण परिणामकारकता सदर विमानांमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. या विमान खरेदी निर्णयामुळे शेकडो ‘एमएसएमई’साठी (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) नवीन संधी उपलब्ध होऊन हजारो नोकऱया निर्माण होतील. तसेच संरक्षण क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरता मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
एचटीटी-40 मध्ये सुमारे 56 टक्के स्वदेशी सामग्री वापरली जाणार आहे. हे प्रमाण 60 टक्क्मयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. एचएएल आपल्या पुरवठा साखळीत एमएसएमईसह भारतीय खासगी उद्योगांना सामील करेल. या खरेदीमुळे सुमारे 1,500 कर्मचाऱयांना प्रत्यक्ष आणि 100 ‘एमएसएमई’मधील 3,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या मूलभूत प्रशिक्षक विमानांची कमतरता हे विमान पूर्ण करेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. खरेदीमध्ये सिम्युलेटरसह संबंधित उपकरणे आणि प्रशिक्षण सहाय्यांचा समावेश असेल. एरोबॅटिक टँडम सीट टर्बो टेनरमध्ये वातानुकूलित कॉकपिट आणि आधुनिक एव्हीओनिक्स देखील असतील.
तीन प्रशिक्षण जहाजांसाठी ‘एल अँड टी’सोबत करार
केंद्रीय मंत्रिमंडळाने 3,108.09 कोटी रुपयांच्या एकूण खर्चात तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजे खरेदी करण्यासाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम समूह लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (एल अँड टी) सोबत करार करण्यास मंजुरी दिली आहे. ही जहाजे 2026 पासून संरक्षण दलाला प्राप्त होणार आहेत. भारतीय नौदलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही जहाजे महिलांसह अधिकारी कॅडेट्सना त्यांच्या मूलभूत प्रशिक्षणानंतर समुद्रात प्रशिक्षण देतील. राजनैतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने ही जहाजे मैत्रीपूर्ण देशांतील कॅडेट्सना प्रशिक्षण देण्यासही उपलब्ध केली जाणार आहेत. या जहाजांची निर्मिती चेन्नईतील कट्टुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्डमध्ये स्वदेशी डिझाईनच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहेत.









