भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढणार : एचएएलकडून होणार निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत सुमारे 45 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावांसाठी आवश्यक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. संबंधित संरक्षण खरेदी स्वदेशी कंपन्यांकडून केली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायुदलासाठी 12 सुखोई-30 एमकेआयच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या विमानांची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून देशातच केली जाणार असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
11 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विमान आणि संबंधित ग्राउंड सिस्टीम सामील असणार आहे. विमानात आवश्यकतेनुसार 60 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा अंतर्भाव असणार आहे. भारतीय वायुदलातील ही सर्वात आधुनिक सुखोई-30 एमकेआय विमाने असणार आहेत. या विमानांमध्ये अनेक भारतीय शस्त्रास्त्रयंत्रणा अन् सेंसर्सना जोडले जाणार आहे.
एसयू-30 एमकेआय भारतीय वायुदलातील सर्वात शक्तिशाली विमान मानले जाते. वायुदलाकडे 272 सक्रीय एसयू-30 एमकेआय विमाने आहेत, या विमानांमध्ये दोन इंजिन्स असून दोन वैमानिकांना सामावून घेण्याची यात क्षमता आहे. यातील काही विमानांना सुपरसोनिक क्षेपणास्त्र ब्राह्मोस डागण्यासाठी देखील अपग्रेड करण्यात आले आहे.
सुखोई विमान 3 हजार किलोमीटरपर्यंत उ•ाण करू शकते. तर याची क्रूज रेंज 3,200 किलोमीटरपर्यंत आहे तर कॉम्बॅट रेडियस 1,500 किलोमीटर इतकी आहे. वजन अधिक असून हे लढाऊ विमान स्वत:च्या अत्याधिक वेगासाठी ओळखले जाते. हे विमान आकाशात 2,100 किलोमीटर प्रतितासाच्याने वेगाने झेपावू शकते.
सुरक्षा, गतिशीलता आणि आक्रमणाची क्षमता वाढविणे अणि मॅकेनाइज्ड फोर्सेच्या सर्वाइवेबिलटीमध्ये वाढ करण्यासाठी लाइट मल्टीपर्पज व्हेईकल्स (एलएएमव्ही) आणि इंटीग्रेटेड सर्व्हिलान्स अँड टार्गेटिंग सिस्टीम (आयसॅट-एस)च्या खरेदीसाठी संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
नौदलासाठीही महत्त्वाचा निर्णय
संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय नौदलासाठी पुढील पिढीच्या सर्वेक्षण नौकांच्या खरेदीस मंजुरी दिली आहे. हायड्रोग्राफिक संचालन करण्यासंबंधी नौदलाच्या क्षमतांमध्ये यामुळे भर पडणार आहे. याचबरोबर परिषदेने वायुदलाच्या प्रस्तावांसाठी आवश्यकता स्वीकृती देखील प्रदान केली असून यात डोर्नियर विमानाचे एवियोनिक अपग्रेडेशन सामील आहे. स्वदेश स्वरुपात निर्मित एएलएच एमके-4 हेलिकॉप्टर्ससाठी एक शक्तिशाली स्वदेशी अचूक निर्देशित शस्त्राच्या स्वरुपात ध्रूवास्त्र शॉर्ट रेंज एअर टू सरफेस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी परिषदेकडून मंजुरी देण्यात आली आहे.









