नवी दिल्ली
माशांचे तेल व इतर उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या मुक्का प्रोटीन्स यांना आयपीओ दाखल करण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे. आयपीओ अर्जाला बाजारातील नियामक सेबी यांच्याकडून कंपनीला मंजुरी मिळाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून 175 ते 200 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे. यापैकी 120 कोटी रुपये विविध कामांसाठी खर्च केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









