वृत्तसंस्था / .चंदीगढ
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगढ येथील पीजीआय संस्थेची प्रशंसा भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. या संस्थेच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान त्यांच्याकडे होते. हा समारंभ शनिवारी पार पडला. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते 15 सुवर्ण, 32 रौप्य आणि 33 कांस्य पदके प्रदान करण्यात आली. या संस्थेचा हा 37 वा दीक्षांत समारंभ होता.
आपल्या कन्येवर याच संस्थेत उपचार करण्यात आले होते. ही संस्था भारताचा गौरव वाढविणारी आहे. या संस्थेचे रुग्णालयही सुसज्ज असून ही संस्था समाजसेवेत पुढे आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी भाषणात केला. मुन्नाभाई चित्रपटाची आठवणही त्यांनी करुन दिली, असे वृत्त आहे.









