Appointment of Premanand Desai as District Coordinator of National Sarpanch Parliament
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी प्रेमानंद देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पुणे येथे एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे दोन दिवसीय अधिवेशन शनिवारी संपन्न झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार व विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, राज्य समन्वयक प्रकाश महाले, कार्यवाह व्यंकटेश जोशी, ज्ञानेश्वर बोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रेमानंद देसाई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन एमआयटीचे प्रमुख विश्वनाथ कराड, राहुल कराड, योगेश पाटील, संतोष राणे यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवत त्यांना नियुक्ती पत्र दिले. राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सरपंच यांना एकत्र करून त्यांच्या अडचणी सोडविणे, ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील एक गाव आदर्श करण्यासाठी सीएसआर फंडाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात सप्तसूत्री कार्यक्रमाचे अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेऊन शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज या गोष्टींवर भर देत शेतकऱ्यांना आवश्यक योजनांची अंमलबजावणी करण्याची कामगिरी करणार आहे. या निवडीबद्दल प्रेमानंद देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दोडामार्ग / प्रतिनिधी