सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस जिल्हा रुग्णालय आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे या दोन्ही रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी खास प्रयत्न करून आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानुसार जिल्हा रुग्णालय येथे डॉ. प्रेरणा पांडुरंगराव गायकवाड यांची पॅथॉलॉजिस्ट म्हणून तर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अजिंक्य रवींद्र वराडे यांची अस्थिरोग तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या दोन ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची असलेली कमतरता आता भरून निघाली आहे. अजून टप्प्याटप्प्याने तज्ञ डॉक्टरांच्या नेमणूका करण्यात येणार आहेत असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी केसरकर यांना दिले आहे अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली. सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात आता तज्ञ डॉक्टरांची भरणा झाली आहे असे युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक बांदेकर यांनी स्पष्ट केले .









