निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण
कोल्हापूर : सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणूकीची धामधूम सुरू असून सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला कामाला लागले आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. जिल्हात होणाऱ्या निवडणुकासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हातील १ ब वर्ग, ९ क वर्ग नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असे १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतीसाठी ३७ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेपासून निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष आणि निष्पक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याद्वारे हाताळण्यासाठी, प्रतिबंधात्मक आणि इतर उपाययोजना करण्याबाबत नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सधिस्थतीत, मलकापूर, शिरोळ नगरपरिषद आणि चंदगड नगरपंचायतीची मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने या नगरपरिषद आणि नगरपंचायतकडे अन्य अधिकाऱ्यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक होते. नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून कोल्हापूर जिल्हयातील सर्व १० नगरपरिषद आणि ३ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे.
अनुक्रमे निवडणूक निर्णय, सहाय्यक निवडणूक निर्णय आणि अतिरिक्त सहा. निवडणूक अधिकारी :
जयसिंगपूर : दीपक शिंदे, टीना गवळी, सुनिता नेर्लीकर. कुरूंदवाड: रूपाली रेडेकर, मनोजकुमार देसाई, विलास भिसे. गडहिंग्लज ऋषिकेत शेळके, देवानंद ढेकळे, व्ही. एन. बुटे. मलकापूर : प्रदीप उबाळे, गणेश लव्हे. कागल अमरदीप वाकडे, अजय पाटणकर, ज्ञानेश्वर शेळकंदे. मुरगूड : तेजस्विनी खोचरे-पाटील, अतिश वाळूज, सुशांत कांबळे, पेठवडगांव : वनिता पवार, अब्दुलरफिक शेख. हातकंणगले सुशिल बेल्हेकर, विशाल पाटील, संदीप चव्हाण. सुमित जाधव, रूपाली सूर्यवंशी. पन्हाळा माधवी शिंदे, चेतनकुमार माळी, संजय वळवी. हुपरी : महेश खिल्लारी, अजय नरळे, भालचंद्र यादव, शिरोळ अनिल हेळकर, राहुल मर्डेकर, विनायक कौलवकर. आजरा : समीर माने, सूरज सुर्वे, म्हाळसाकांत देसाई. चंदगड : राजेश चव्हाण,








