Appointment of Mandar Oraskar as Malvan Youth Sena Coordinator
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मालवण तालुका युवा समन्वयक पदी मंदार ओरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
सातत्याने युवकांना प्रोत्साहन देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व युवकांना एकसंघ करून विविध उपक्रम राबविणारे ओरसकर हे आगामी काळातही युवकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना व्यासपीठ मिळवून देत युवकांच्या प्रगतीसाठी निश्चितच आश्वासक कार्य करतील. असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.
मालवण / प्रतिनिधी









