खानापूर : खानापूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून चंद्रशेखर तळवार यांनी पदभार स्वीकारला. याबद्दल खानापूर वकील संघटनेच्यावतीने न्यायाधीश चंद्रशेखर तळवार यांचे स्वागत करण्यात आले. न्यायाधीश झरीना यांची बदली झाल्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून खानापूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात न्यायाधीश नसल्याने या न्यायालयाचे कामकाज बेळगाव येथील न्यायालयात चालत होते. त्यामुळे खानापूर तालुक्यातील अशीलांची गैरसोय होत होती. सोमवार दि. 12 रोजी खानापूर न्यायालयात चंद्रशेखर तळवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश विरेश हिरेमठ, वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी,
अॅड. केशव कळ्ळेकर, मारुती कदम व्यासपीठावर उपस्थित होते. सुरवातीला अॅड. एस. के. नंदगडी यांनी प्रास्ताविक केले. यानंतर बार असोसिएशनच्यावतीने न्यायाधीश तळवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर तळवार म्हणाले, वकील आणि न्यायाधीश यांच्यात समन्वय राखून अशिलाना जलद न्याय देण्यासाठी वकिलानी प्रयत्न करावेत, असे सांगितले. यावेळी एच. एन. देसाई, जी. पी. पाटील, आर. एन. पाटील, पी. एन. बाळेकुंद्री, एस. एन. भोसले, आर. एम. हिरेमठ, पी. वाय. पाटील, एस. आर. तारिहाळ, एम. टी. हेरेकर, एस. एम. होगल, विणा माने, पुष्पा मादार, विजय हिरेमठ आदी उपस्थित होते. ए. डी. लोकरे यांनी आभार मानले.









