मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले नियुक्ती पत्र
प्रतिनिधी
बांदा
आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बांदा येथील मनसेचे माजी विभागप्रमुख मिलिंद सावंत यांची मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.तसे पत्र मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी दिले.
मिलिंद यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला बांदा उपशहर अध्यक्षपद, त्यानंतर बांदा विभाग अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१० साली पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना अटक झाली. त्यावेळी सावंतवाडी येथे मिलिंद यांनी पुढाकार घेत आंदोलन छेडले. त्यांना अटक करण्यात आले होते. डिगणे, डोंगरपाल, डेगवे, इन्सुली , निगुडे, पडवे,माजगाव,विलवडे, भालावल या मनसेची शाखेची स्थापन करण्यास मिलिंद यांची मोलाची भुमिका होती.तसेच बांदा परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावल्या. यांची पक्षाने दखल घेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचे मिलिंद सावंत यांनी सांगितले.









