ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून आव्हाडांची निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी आज 35 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राजभवनात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. अजितदादांचे बंड समोर आल्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांकडे नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल तो त्यांना लागू होईल.








