कर्नाटक दलित युवा संघटनेची मागणी
खानापूर : खानापूर येथील सरकारी दवाखान्यात त्वचा, कान, नाक,घसा आदी रोगावर तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने तालुक्यातील रुग्णांना यावर उपचार घेण्यासाठी बेळगावला जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी खानापूर सरकारी दवाखान्यात त्वचा रोग तज्ञ आणि कान, नाक, घसा रोग तज्ञांची तातडीने नियुक्ती करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका कर्नाटक दलित युवा संघटनेतर्फे नुकतीच करण्यात आली. या मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर यांना निवेदन देवून करण्यात आले आहे.
खानापूर येथील सरकारी दवाखान्यात सर्व विभागात तज्ञ डॉक्टर नियुक्त आहेत. मात्र त्वचा रोग आणि कान,. नाक, घसा या विभागाचे तज्ञ डॉक्टर नसल्याने या विभागात दोन्ही पदे रिक्त असूनदेखील या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तालुक्यातील रुग्णांची या दोन विभागाचे डॉक्टर नसल्याने बेळगाव येथील खासगी तसेच सरकारी दवाखान्यातील डॉक्टराकडे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णाना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. यासाठी जिल्हा आरोग्याधिकारीही तातडीने खानापूर येथील रिक्त असलेल्या त्वचा आणि कान, नाक, घसा रोग तज्ञांची तातडीनें नियुक्ती करावी, अशी मागणी कर्नाटक दलित युवा संघटनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोहर मादार, उपाध्यक्ष मारुती तळवार, हणमंत मादार, जयपाल गणाचारी, कलमेश्वर मादार, प्राणेश तळवार उपस्थित होते.









