Artificial nails : आजकाल नखांच सौंदर्य वाढवण्यासाठी कृत्रिम नखे लावण्याचा ट्रेंड आहे. या नेल्सवर तुम्ही विविध प्रकारचे नेल आर्ट करू शकता. सुंदर ग्रूम केलेल्या नखांमुळे हातांचे सौंदर्य वाढते. जर तुमची नखे नीट वाढत नसतील किंवा ती नाजूक असतील तर तुम्ही कृत्रिम नखांचा पर्याय वापरून बघू शकता. हल्ली विविध प्रकारची कृत्रिम नखे मिळतात. कृत्रिम नखे वापरणे हानीकारक नसले तरी, ती बोटांना लावणे आणि काढणे यामध्ये ऍसिड आणि इतर रसायनांशी आपला संपर्क येतो ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. कृत्रिम नखे खराब झाली तर त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते किंवा बोटांच्या त्वचेला इतर समस्या होऊ शकतात. .
कृत्रिम नखांमुळे होऊ शकणाऱ्या समस्या
घरच्या घरी सुद्धा ऍक्रेलिक नखं काढता येऊ शकतात. परंतु फिलिंग आणि फाइलिंग करताना जी रसायने वापरली जातात त्यामुळे तुमची खरी नखे कमकुवत होऊ शकतात. तसेच तुम्हाला आधीपासूनच नखांना फंगल इन्फेक्शन असल्यास कृत्रिम नखांमुळे ते वाढू शकते. जेल सुकवताना UV लाइटमुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडून त्वचेचे नुकसान होऊ शकते. अतिनील प्रकाशामुळे त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो. तसेच कृत्रिम नखे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी रसायने तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या नखांभोवती लालसरपणा किंवा सूज दिसू शकते व इन्फेक्शन झाल्यास नखांमध्ये पस होऊ शकतो.
कृत्रिम नखे एखाद्या गोष्टीत अडकल्यास किंवा आपटली गेल्यास ती अर्धवट तुटू शकतात आणि त्या गॅपमधून जंतू, यीस्ट किंवा फंगस प्रवेश करू शकतात आणि त्यांची त्या गॅपमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे तुमच्या नखांना संसर्ग होऊ शकतो.
ऍक्रेलिक किंवा जेल नखे काढण्यासाठी, आपल्याला बोटे ऍसिटोनमध्ये बुडवून ठेवावी लागतात..हे रसायन तुमच्या खऱ्या नखांसाठी चांगले नाही कारण यामुळे आपली नखे खूप कोरडी होतात आणि त्वचेलाही त्रास होऊ शकतो. नैसर्गिक नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. जर तुम्हाला पूर्वी नेल फंगसचा त्रास झाला असेल तर कृत्रिम नखांपासून दूर रहा. LED लाइटसह जेल पॉलिश कडक करणारे सलून निवडा, ज्यामध्ये कमी प्रमाणात UV प्रकाश असेल.
आर्टिफिशियल नेल्सची आवड असल्यास जरूर त्यांचा वापर करा पण त्याबरोबरच स्वतःच्या नैसर्गिक नखांचीही काळजी घ्या. नखं वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करून बघा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









