पणजी / प्रतिनिधी
कामगार पुरवठा सोसायटीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याने 459 कर्मचारी घेतले असून ते 2013 पासून काम करीत आहेत, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केली.
सार्वजनिक बांधकाम खात्यात झालेल्या नोकरभरती घोटाळ्याचाही सरदेसाई यांनी यावेळी आढावा घेतला. बाबूश मोन्सेरात यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्याचीही आठवण त्यांनी करुन दिली. दक्षता खात्याच्या अहवालाचे दाखलेही दिले. या नोकरभरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खरा होता, ते या अहवालावरून स्पष्ट होते. परीक्षेत गुणांचा झालेला फेरफार किंवा इतर प्रकार हे भयानक आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.









