गुरुवारी पुन्हा शक्तिप्रदर्शनाने भरणार अर्ज
बेळगाव : म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर आणि उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी मंगळवारी आपले अर्ज दाखल केले आहेत. मात्र पुन्हा गुऊवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. मंगळवारी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या दोघा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा गुरुवार दि. 20 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यादिवशी शक्तिप्रदर्शन करत दोन्ही उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. महानगरपालिकेतील निवडणूक कार्यालयामध्ये दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. याचबरोबर उत्तरचे अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महानगरपालिका कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मोजक्याच कार्यकर्त्यांना आत प्रवेश देण्यात आला. आता गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत म. ए. समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून आतापासूनच तयारी सुरू केली आहे.









