पहिली दोन स्टोअर मुंबई आणि दिल्लीत : 2 सप्टेंबर रोजी बेंगळूरात तिसऱ्या स्टोअरचे होणार उद्घाटन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जागतिक पातळीवरील दिग्गज टेक कंपनी अॅपल लवकरच बेंगळूरूमध्ये आपले रिटेल स्टोअर उघडणार आहे. या स्टोअरचे नाव ‘अॅपल हेबल’ आहे आणि ते 2 सप्टेंबर 2025 रोजी खुले होणार असल्याची माहिती आहे. हे देशातील अॅपलचे तिसरे स्टोअर राहणार आहे. अॅपलची तज्ञांची टीम ग्राहकांना उत्पादनांबद्दल संपूर्ण माहिती देईल आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य उत्पादन निवडण्यास मदत करेल. तुम्ही पिकअप सेवेचा देखील लाभ घेऊ शकता. ग्राहकांना केवळ स्टोअरमध्ये उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार नाही, तर ते अॅपल पिकअप सेवेचा देखील लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता आणि स्टोअरमधून उत्पादन घेऊ शकता. याशिवाय, स्टोअरमध्ये अॅपल ट्रेड-इन प्रोग्राम देखील असेल, ज्या अंतर्गत जुन्या उपकरणांची देवाणघेवाण नवीन उपकरणांसाठी करता येईल.
अॅपलचे दुसरे प्रमुख केंद्र बेंगळूरू
कॅलिफोर्नियातील मुख्यालयानंतर बेंगळूरू आता अॅपलचे दुसरे सर्वात मोठे ऑपरेशनल हब बनले आहे. अलीकडेच, कंपनीने उत्तर बेंगळूरूमधील सांके रोडवरील एम्बेसी झेनिथ येथे 2.7 लाख चौरस फूट ऑफिस स्पेस घेतली आहे ज्यामध्ये 10 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. हा करार 1,010 कोटी रुपयांचा आहे.
अॅपलचे भारतात उत्पादनावर लक्ष
कंपनी भारतात केवळ रिटेल स्टोअर्स उघडत नाही, तर उत्पादनावर देखील लक्ष केंद्रित करते. अलीकडेच असे वृत्त आले आहे की आयफोन 17 मालिकेच्या सर्व मॉडेल्सचे उत्पादन भारतात होईल. हे उत्पादन तामिळनाडूतील होसूर येथील टाटा ग्रुपच्या कारखान्यात आणि बेंगळूरूजवळील फॉक्सकॉनच्या कारखान्यात होत आहे. टिम कुक यांनी असेही सांगितले की जून 2025 मध्ये अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन भारतात बनवले आहेत.
अॅपल स्टोअरचा भारतामधील प्रवास
- सीईओ टिम कुक यांनी 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील ‘अॅपल बीकेसी’ स्टोअरचे उद्घाटन केले.
- टिम कुक यांनी 20 एप्रिल 2023 रोजी दिल्लीतील ‘अॅपल साकेत’ स्टोअरचे उद्घाटन केले.
- तिसरे स्टोअर 2 सप्टेंबर 2025 रोजी बेंगळूरूमधील फिनिक्स मॉल ऑफ एशिया येथे उघडणार आहे.
भारतीय संस्कृतीनुसार डिझाइन
मोराच्या पिसांनी प्रेरित सुंदर कलाकृती अॅपल हेबल स्टोअरचा लूक आणि डिझाइन भारताच्या संस्कृतीला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. स्टोअरच्या बाहेरील सजावटीमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी आणि अभिमानाचे प्रतीक असलेल्या मोराच्या पिसांनी प्रेरित सुंदर कलाकृती आहेत. स्टोअरमध्ये ‘टुडे अॅट अॅपल’ सत्र देखील राहणार आहे. अॅपल हेबल स्टोअर्स ‘टुडे अॅट अॅपल’ सत्रे आयोजित करतील, जी पूर्णपणे मोफत असतील. या सत्रांमध्ये, अॅपलचे क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट, स्टोरीटेलिंग, उत्पादकता आणि कोडिंग यासारख्या विषयांवर ग्राहकांना कार्यशाळा देतील.









