कंपनीचा महसूल 83 अब्ज डॉलरच्या घरात ः कंपनीचे सीईओ टिम कुक यांची माहिती
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलचा जून तिमाहीमध्ये भारतामध्ये महसूल जवळपास दुप्पट झाला आहे. या अगोदर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून 2022 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल हा 83 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे.
ऍपलने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये समाप्त झालेल्या तिसऱया तिमाहीचे नफा कमाईचे आकडे सादर केले आहेत. यामध्ये वर्षाच्या आधारे कंपनीचा नफा हा दोन टक्के अधिक राहिला आहे.
अमेरिका, युरोप आणि अशिया प्रशांत क्षेत्रामध्ये जून तिमाहीचे आकडे सकारात्मक आले आहेत. विकसित आणि सावरणाऱया बाजारात जून तिमाहीत चांगले आकडे समोर येत आहेत. ज्यामध्ये ब्राझील, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या ठिकाणी दहा अंकांची मजबूत वृद्धी प्राप्त केली तर भारतात दुप्पट महसूल प्राप्त झाल्याचे कुक यांनी सांगितले आहे.
ऍपलचे मुख्य आर्थिक अधिकारी व वरिष्ठ उपाध्यक्ष लुका माइस्ट्री यांनी यावेळी म्हटले आहे, की ऍपलचे ग्राहक हे कंपनीच्या उत्पादनांमध्ये सलगपणे गुंतवणूक वाढवत आहेत, तसेच अन्य प्रकारची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही ते प्रयत्न करत असल्याचे माइस्ट्री यांनी नमूद केले
अंदाजापेक्षा अधिक महसूल
रशियामधील युद्धजन्य स्थिती व अन्य जागतिक घडामोडांच्या परिणामामुळे आयात निर्यातीसह अन्य काही घटक प्रभावीत झाले होते. मात्र या प्रवासातही कंपनीने निश्चित केलेल्या अंदाजापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी स्पष्ट केले आहे.









