कॅलिफोर्निया :
अॅपलने मंगळवारी आपल्या ‘स्कायरी फास्ट’ या विशेष कार्यक्रमात एम3 मालिका चिप आणि त्यात सुसज्ज मॅक उपकरणे लाँच केली. या उपकरणांमध्ये मॅकबुक प्रो 14, मॅकबुक प्रो 16 आणि आयमॅक यांचा समावेश आहे. मॅकबुक प्रथमच स्पेस ग्रे रंगात सादर करण्यात आले आहे. अॅपलचे नवीन एम3, एम3 प्रो आणि एम3मॅक्स चीप 3एनएम तंत्रज्ञानावर बनवलेले आहेत. एम1 आणि एम2 दोन्ही अनेक महिन्यांपूर्वी लॉन्च केले गेले होते, परंतु यावेळी अॅपलने एम3, एम3 प्रो आणि एम3 मॅक्स एकत्र लॉन्च केले आहेत.
मॅकबुक प्रोची सुरुवातीची किंमत 1.69 लाख तर नवीन एम3 चिपसह 14 इंच मॅकबुक प्रो ची सुरुवातीची किंमत 1.69 लाख रुपये आहे. तर एम3 मॅक्स चिप सह मॅक्सबुकप्रोची किंमत 3.19 लाख रुपये आहे. यात 22 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. अॅपलने फॅनचा आवाज पूर्णपणे कमी करण्याचा दावा केला आहे.
एम3 मॅक्स चिपसह सादर केलेला मॅकबुक प्रो इंटेल चिपपेक्षा 11 पट वेगवान आहे. ही उपकरणे आधीच ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहेत. मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीतील साकेत स्टोअरमधूनही ते खरेदी करता येणार आहे.
महत्त्वाचे….
एम3 चिपसह 14 इंच मॅकबुक प्रोची आधीची किंमत 1.69 लाख रु.
आयमॅक एम3 चिपसह सादर केले असून 7 रंगांमध्ये उपलब्ध होणार
अॅपलने नवीन एम3, एम3 प्रो व एम3 मॅक्स चिप्स 3 एनएम तंत्रज्ञानावर बनवल्या आहेत.









