वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टेक जायंट अॅपल पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्डवाइड डेव्हपर्स कॉन्फरन्समध्ये (डब्लूडब्लूडीसी) आपली आगामी आयओएस 17 सॉफ्टवेअरची आवृत्ती सादर करणार आहे. या कार्यक्रमाच्या अगोदर अॅपलच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टमशी संबंधीत तपशील लीक होत असून त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
यामध्ये आयओएस17, आयपॅडओएस 17, मॅकओएस 14, आयओएस 10 आणि टीव्हीओएस 17 ऑपरेटिंग सिस्टम या वर्षीच्या डब्लूडब्लूडीसीमध्ये सादर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आयओएस 17 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केल्याने आयफोनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यो जोडली जाणार असून यामधून त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती आहे. परंतु या संदर्भात अॅपलकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात कंपनीचे काय स्पष्टीकरण येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
हा आयफोन आयओएस 17 ला सपोर्ट करणार नाही
अहवालानुसार, आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन एक्सला नवीन आयओएस आवृत्तीसाठी सपोर्ट मिळणार नाही. नवीन वैशिष्ट्यांना समर्थन देण्यासाठी नवीनतम हार्डवेअरदेखील आवश्यक होते. हे असे सॉफ्टवेअर आहे जे नोव्हेंबर 2015 ते नोव्हेंबर 2017 दरम्यान लॉन्च करण्यात आले होते.









