मुंबई
भारतात जवळपास 25 वर्षाहून अधिक काळ आपली उपस्थिती दर्शवणाऱ्या आयफोन निर्मिती कंपनी अॅपलचे भारतातले पहिलेवहिले स्टोअर आज मंगळवार(18) रोजी मुंबईत सुरु होत आहे. यायोगे आगामी काळात अॅपल आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. पहिले स्टोअर मुंबई 18 रोजी तर दुसरे स्टोअर दिल्लीत 20 एप्रिल रोजी सुरु होत आहे. या आठवड्यात भारतात अस्तित्वाची 25 वर्षे कंपनी साजरी करत असून विस्ताराच्या उद्देशाने पहिली दोन स्टोअर्स भारतात सुरु केली जात आहे. स्थानिक लुक व अनुभव देण्यासाठी नवे स्टोअर सज्ज असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारतात सेवेसाठी सज्ज : सीईओ टीम कुक
भारत हा उत्तम संस्कृती जपणारा देश असून खूप सारी ऊर्जा या देशात आहे. या उत्साहाच्या वातावरणात अॅपलला स्टोअरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आगामी काळात कार्य करायचे आहे. ग्राहकांना सहकार्य करत गुंतवणूकीसोबत कल्पकतेसोबत सेवा करण्यासाठी कंपनी सज्ज असणार असल्याचे मत अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी मांडले आहे.









