सदरच्या उत्पादनांची विक्री 23 सप्टेंबरपासून : एअरपॉड्स व घडय़ाळ सादर
वृत्तसंस्था /क्यूपर्टिनो
कॅलिर्फोनियाच्या क्यूपर्टिनो या ठिकाणी बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री जगातील दिग्गज टेक कंपनी ऍपल यांनी आपली नवीन उत्पादने बाजारात सादर केली आहेत. यामध्ये कंपनीने प्रामुख्याने आयफोन 14 आवृत्तीसह घडय़ाळही सादर केले आहे.
दरम्यान यामध्ये आयफोन 14 च्या आवृत्तीमध्ये 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि 14 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा यामध्ये समावेश होते. या उत्पादनांसाठी प्री ऑर्डर 9 सप्टेंबरच्या सायंकाळी 5.30 वाजता सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांसाठी आयफोन 14 प्लस वगळता 16 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट केले असून सुरुवातीची किमत ही 79,900 रुपये राहणार आहे. सदरच्या उत्पादनांसोबत कंपनीने घडय़ाळाची आवृती 8 मोठय़ा डिस्ले व बॉडी टेम्परेचर सेंसरसह अन्य आरोग्य विषयक माहिती देणारी फिचर्स प्राप्त होणार आहेत. यासह एअरपॉड्स प्रोचेही सादरीकरण केले आहे. कंपनीचा हा कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोरोनामुळे 2020 नंतर साजरा झाला आहे.
आयफोन फिचर्स
- 14 प्रो मॅक्समध्ये 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा
- ए16 चिपसेटला मिळणार चॅलेंज
- 6.1 इंच डिस्प्ले व 6.7 इंच डिस्प्ले मिळणार
- फिजिकल सिम ट्रे बाजूला केला आहे मात्र भारतात कसा असेल यावर स्पष्टीकरण दिलेले नाही
एअरपॉड्स प्रो व वॉच- फिचर्स
- ऍपलच्या एअरपॉड्स प्रो 2 याची किमत ही 249 डॉलर राहणार
- ऍपल वॉच 8 आवृत्ती व अल्ट्रा वॉचही बाजारात
- एका चार्जिंगवर वॉच 36 तासांपर्यंत चालणार असल्याचा दावा
- नव्या बदलासोबत जीपीएस प्रणालीची सुविधा
- वॉच 16 सप्टेंबरपासून होणार उपलब्ध









