मुंबईः
एअर पॉड्सच्या समभागाची निर्मिती ऍपल पुरवठादार कंपनीकडून भारतामध्ये केली जात आहे. भारतामध्येच तयार झालेल्या सदरच्या उत्पादनाची निर्यात आगामी काळामध्ये केली जाणार आहे. या योगे चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा दृष्टिकोन कंपनीने बाळगला आहे. ऍपल इंक पुरवठादार कंपनीकडून एअर पॉड्सच्या सुटय़ा भागांची निर्मिती भारतातील कारखान्यामध्ये केली जात आहे. भारतामध्ये निर्मिती प्रक्रियेला जास्तीतजास्त वेग दिला जाणार आहे. भारतातील जेबील इंक यांच्या मार्फत एअर पॉड्सच्या भागांचा व्हिएतनाम व चीनला पुरवठा केला जाणार आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करून ऍपल कंपनी भारतात जास्तीत जास्त उत्पादनांच्या घटकांची निर्मिती करण्यासाठी नियोजन करत आहे.









