सरकारच्या स्मार्टफोन पीएलआय योजनेचा प्रभाव : अॅपलसोबत अन्य तीन कंपन्यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील 19 महिन्यात 1 लाखाहून अधिक नवीन नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्याची माहिती आयफोन निर्माती प्रसिद्ध कंपनी अॅपलने नुकतीच दिली आहे. सरकारच्या स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत आयफोन तयार करणाऱ्या अॅपलच्या भारतातील विक्रेते आणि पुरवठादारांच्या इकोसिस्टमद्वारे या नोकऱ्या निर्माण केल्या असल्याचेही स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.
अॅपलच्या 3 विक्रेत्यांनी मिळून 60टक्के नवीन रोजगार निर्माण केले आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये पीएलआय योजना लागू झाल्यापासून 19 महिन्यात 1 लाखाहून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. अॅपलला एकत्र करणारे तीन विक्रेते फॉक्सकॉन, पेग्ट्रॉन आणि विस्ट्रॉन आहेत. या तीन विक्रेत्यांनी मिळून 60टक्के नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
फॉक्सकॉनने दिल्या 35,500 नोकऱ्या
हा डाटा अॅपलच्या इकोसिस्टममध्ये सहभागी असलेले तिन्ही विक्रेते आणि कंपन्यांवर आधारित आहे. ज्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडे नियमितपणे रोजगार क्रमांक दाखल करावा लागतो. 1 लाख नवीन नोकऱ्यांपैकी, तामिळनाडूस्थित फॉक्सकॉन, जी केवळ आयफोन बनवते जिने मिळालेल्या माहितीनुसार सर्वात जास्त रोजगार दिला आहे. फॉक्सकॉनने 35,500 हून अधिक नोकऱ्या दिल्या आहेत.
इंडिया सेल्युलर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 7 वर्षांमध्ये मोबाईल डिव्हाइस उत्पादक आणि त्यांच्या पुरवठादारांनी निर्माण केलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची संख्या सुमारे 20 लाख आहे.
डिसेंबर 2022 मध्ये एका महिन्यात 1 अब्जडॉलर (रु. 8,272 कोटी) पेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात करणारी अॅपल ही पहिली कंपनी बनली असल्याची नोंद झाली आहे.
पीएलआय योजनेअंतर्गत 7,000 नोकऱ्या
आर्थिक वर्षात एक महिना शिल्लक असताना आणखी काही हजार नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. उर्वरित नोकऱ्या अॅपलच्या इकोसिस्टमद्वारे उपलब्ध केल्या जातात, ज्यामध्ये घटक आणि चार्जरचे पुरवठादार समाविष्ट असतात. या पुरवठादारांनी 40 हजार अतिरिक्त नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि त्यात टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सालकॉम्प पीएलसी, एव्हरी, फॉक्सलिंक, सनवोडा आणि जबिल या नावांचा समावेश आहे.









