Tim Cook Meets PM Narendra Modi : Apple चे पहिले रिटेल स्टोअर भारतात लाँच केल्यावर त्याच्या एका दिवसानंतर, कंपनाचे सीईओ टिम कुक यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून त्यांनी भारतात आपला पाया आणि गुंतवणूक योजनांचा विस्तार करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत शिक्षणापासून पर्यावरणापर्यंतच्या क्षेत्रांवर तंत्रज्ञानाच्या सकारात्मक परिणामांबाबत ‘सामायिक विचार’ ठेवण्यात आली.
भेटीनंतर सीईओ टिम कुक यांनी ट्विट करताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. भारताच्या भविष्यावर तंत्रज्ञानाचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. आम्ही शिक्षण आणि पर्यावरणा क्षेत्रात काम करण्यासाठी उत्पादन वाढण्यास आणि गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत.” असे म्हटले आहे.
टिम कुकच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान मोदींनी भारतात होत असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित क्रांतींवर विशेष लक्ष केंद्रित करून विविध विषयांवर चर्चा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे कि, “टिम कुक, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला! वैविध्यपूर्ण विषयांवर विचारांची देवाणघेवाण करून आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञान-सक्षम परिवर्तनांवर प्रकाश टाकताना आनंद झाला.” असे म्हटले आहे.









