महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आसद खान सोसायटी परिसरात सभा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावमधून काँग्रेसचे उमेदवार देण्यात आले आहेत. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने आसिफ ऊर्फ राजू सेठ अशा चांगल्या उमेदवाराची निवड केली आहे. आता जनतेनेदेखील मतदान करून त्यांना विधानसभेत पाठविणे आवश्यक आहे. आणि आपण ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ सेठ यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आसद खान सोसायटीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. प्रत्येकाने आसिफ सेठ यांना आपले बहुमोल मत देऊन निवडून द्यावे. बेळगावच्या विकासासाठी आसिफ सेठ यासारख्या उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे. भाजपच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. त्याचप्रमाणे महागाईमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सर्व समस्यांबाबत आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने काँग्रेसने आपला अजेंडा जाहीर केला आहे. बेरोजगारी, शिक्षण, विकास अशा सर्वच गोष्टींना प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांसाठी मोफत बसप्रवास, तसेच प्रतिमहा दोन हजार भत्ता अशा विविध घोषणा केल्या आहेत. काँग्रेस सत्तेवर आल्यावर यांची पूर्तता नक्कीच करेल. त्यामुळे काँग्रेसला बहुमोल मत देऊन निवडून द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले. य् ााप्रसंगी माजी आमदार फिरोझ सेठ म्हणाले, बेळगावच्या विकासासाठी आसिफ सेठ यांना मार्गदर्शन करण्याकरिता कायम पाठीशी राहीन, त्याचप्रमाणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले. शहराचा विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची संधी द्यावी, आपले बहुमोल मत देऊन निवडून द्यावे, असे आवाहन आसिफ सेठ यांनी केले.य् ाा बैठकीला विधानपरिषद सदस्य जब्बार खान तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.









