21 जून रोजी आळंदी येथून प्रस्थान : महाप्रसादानंतर दिंडीची सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वार रोड येथील वारकरी महासंघ बेळगावच्या दिंडी व्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी झाली. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष हभप भाऊसाहेब पाटील होते. यावेळी या बैठकीत यंदा दिंडी काढण्याचे ठरविण्यात आले. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत दिंडीचे नियोजन केले गेले.
21 जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून दिंडीचे प्रस्थान, 22 ते 23 जून पुणे, 24 व 25 जून सासवड, 26 जून जेजुरी, 27 जून वाल्हे, 28 व 29 जून लोणंद, 30 जून तरडगाव, 1 व 2 जुलै फलटण, 3 जुलै बरड, 4 जुलै नातेपुते, 5 जुलै माळशिरस, 6 जुलै वेळापूर, 7 जुलै भंडीशेगाव, 8 जुलै रोजी वाखरी, 9 व 11 जुलै रोजी पंढरपूर तर द्वादशीच्या महाप्रसादानंतर दिंडीची सांगता होणार आहे. या दिंडीमध्ये ज्यांना सहभाग घ्यावयाचा असेल त्यानी प्रभाकर सांबरेकर, शंकर बाबली (मो. 9945334058), अशोक हारकारे (कार्वे) (9422795865), एस. आर. पाटील (गडहिंग्लज), संदीप पाटील (नेसरी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रास्ताविक व स्वागत हभप अशोक हारकारे यांनी केले. भाऊसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. हभप शंकर बाबली यांनी आभार मानले.