► प्रतिनिधी
कोल्हापूर
करवीर तालुक्यातील कंदलगाव येथील इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त मुलांचे 1 व मुलींचे 1 प्रत्येकी 100 विद्यार्थी व विद्यार्थिनी क्षमतेचे नवीन स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षाकिंत प्रतीसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर व संबंधित वसतिगृहाचे अधीक्षकांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे. इच्छुकांनी माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, येथे समक्ष संपर्क साधावा.
Previous Articleफुटबॉल जगतातला बाप ‘आऊट’ झाला….
Next Article कट्टर शिवसैनिक ग्रुपतर्फे गाय-वासरुंना चारा








