वाकरे / प्रतिनिधी
चिंचवडे तर्फ कळे (ता करवीर) येथील विद्यामंदिरमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या शरण्या उत्तम कांबळे या विद्यार्थिनीस ब्लड कॅन्सर झाला असून तिला आर्थिक मदत करून जगण्याचे बळ द्यावे असे आवाहन प्राथमिक शाळा आणि तिच्या पालकांनी केले आहे.
बालपण देगा देवा असे आपण म्हणतो,पण हे बालपण फुलायच्या आधीच कोमेजू लागले तर किती वाईट वाटते. असेच संकट एका चिमुकलीवर आले आहे. विद्यामंदिर चिंचवडे तर्फे कळे (ता. करवीर) येथील सहा वर्षाची इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी शरण्या कांबळे असे तिचे नाव. नियतीने तिचे हे बालपण हसरे खेळते न ठेवल्याने तिला ब्लड कॅन्सरने गाठले आहे. हातावर पोट भरणारे कुटुंब आणि वडील उत्तम कांबळे सेंट्रींग कामगार.एकीकडे जगण्याची धडपड आणि मुलीच्या आजाराची जबाबदारी,प्रारब्धापुढे सगळे जरी हतबल असले तरी जगण्याची जिद्द आणि तिच्या चिमुकल्या पंखात बळ भरण्यासाठी समाजातील उदार,दानशूर लोकांनी पुढे येवून मदत करण्याची गरज आहे.तिच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे.दानशूर लोकांनी या कुटुंबाला सढळ हस्ते मदत करून शरण्याच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलवण्याचे प्रयत्न करूया असे आवाहन वडील उत्तम कांबळे व चिंचवडे शाळेचे मुख्याध्यापक रवी परीट यांनी केले आहे.ज्यांना मदत पाठवायची आहे त्यांनी उत्तम कांबळे महाराष्ट्र बँक ६८०१००१६३७७ अथवा ७७४३८४९२९२ या फोन पे वर पाठववावी असे आवाहन करण्यात आले आहे.









