आमदार राजू सेठ, प्रशासनाकडून शांतता बैठक
बेळगाव : रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी होणारी ईद ए मिलादची मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत वरील आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, आमदार राजू सेठ, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शांतता समितीचे सदस्य व शहरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणारी ईद ए मिलादची मिरवणूक आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ही मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. बैठकीला मुस्लीम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.









