शिरोळ प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, संचालक, चेअरमन माजी आमदार कै. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी मीना बोरवणकर यांना जाहीर करण्यात आला. रोख एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र, स्मूर्ती चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली.
यावेळी बोलताना विनोद शिरसाट व गणपतराव पाटील म्हणाले की, राज्यांचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्राच्या उभारणी करीता सहकार, कृषी, औद्योगिक समाज रचनेचे स्वप्न पाहिले. त्यांच्या याच स्वप्नांचा ध्यास घेऊन त्या पिढीतील कर्तृत्व संपन्न सहकार महर्षी दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धीची संपन्नतेची बीजे रोवली. या सहकारी संस्थामुळे भागाचा विकास झाला. सारे पाटील हे साठ वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात वावरले. विधानसभेचे आमदार दत्त कारखान्याचे चेअरमन म्हणून दीर्घ काळ काम केले. जयप्रकाश नारायण,साने गुरुजी,एसएम जोशी,अच्युतराव पटवर्धन यांच्यासारख्या महान व्यक्तींचा सहवास लाभल्याने आयुष्यभर एक ध्येयवाद समोर ठेवून नीतीमूल्यांची जपणूक करीत शेवटपर्यंत कार्यरत राहिले.
एक एप्रिल 2015 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाले त्याच वर्षातून त्यांच्या नावाने स्वर्गीय डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार देण्यास आप्पासाहेब उर्फ सारे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. यापूर्वी स्व. एन. डी. पाटील , स्व आमदार गणपतराव देशमुख, स्व. बी. जे. खताळ पाटील, त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमती चेतना गालासिनहा, कृषी क्षेत्रातील तज्ञ अशोक बंग व गतसाली माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावर्षीपासून निवड समितीचे दोन पुरस्कार वाढीव देण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजकार्य पुरस्कार कृषी क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संशोधन करणाऱ्या सुधीर भोंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.51 हजार रुपये रोख, शिल्ड व पारितोषक असे पुरस्काराचे स्वरूप आहे तर स्व आप्पासाहेब सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार तालुक्यातील घालवाड गावची कन्या नेमबाजी या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत असलेली राही सरनोबत हिला रोख 25 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई,संचालक सर्वश्री अनिलराव यादव,महेंद्र बागी,दरगु गावडे,भैय्यासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य दलित मित्र अशोकराव माने,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील,माधवराव धनवडे,शेखर पाटील,दामोदर सुतार,पृथ्वीराज यादव, सर्जेराव शिंदे, रणजीत पाटील,कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









