मुंबई
एपीएल अपोलो ट्यूब्स या कंपनीचे समभाग बुधवारी शेअरबाजारात घसरणीत असताना दिसले. समभागाचा भाव शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 2.12 टक्के घसरत 1605 रुपयांवर खाली आला होता. कंपनीने सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये आपल्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ नोंदविली आहे. असे असतानाही कंपनीच्या समभागामध्ये घसरण दिसून आली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने विक्रीमध्ये 12 टक्के वाढ नोंदवली आहे.









