रहदारीला शिस्त लागणार : अनेकांतून समाधान
बेळगाव : एपीएमसी-संगमेश्वरनगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत सिग्नलची उभारणी करण्यात आली होती. मात्र ते सिग्नल बंद असल्याने समस्या निर्माण होत होती. वाहन चालक कोणताही नियम पाळत नसल्याने काहीवेळा या ठिकाणी अपघातही घडले आहेत. त्यामुळे या सर्कलमधील सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्याम मागील दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणचे सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत या ठिकाणी सिग्नलची उभारणी करून वर्ष उलटले तरी ते सिग्नल बंद अवस्थेतच ठेवण्यात आले होते. दरम्यान सुरूवातीला येथे सिग्नल सुरू करण्यात आले होते. मात्र काही दिवस सुरू ठेवून ते पुन्हा बंद करण्यात आल्याने समस्या निर्माण होत होती. महत्त्वाचे म्हणजे एपीएमसी असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. याचबरोबर बॉक्साईट रोडवरही वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. बॉक्साईट रोडवरुन अझमनगर, वैभवनगरमार्गे हा रस्ता थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथील सिग्नल सुरू करणे गरजेचे होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता सिग्नल सुरू करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









