लाचलुचपतच्या रडारवर असणाऱ्या PSI सूरज पाटीलांची तब्येत खालावली
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता 16 ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरचा प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांचा यात समावेश आहेत. ते मंत्र्यांच्या दौऱ्यात काल होते . त्यानंतर आज सकाळपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांची अटक कारवाई लांबणीवर गेली आहे. श्री पाटील हे लाच लुचपत विभागाच्या रडारावर होते . त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे . मात्र लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास जिल्हा लाच लुचपत विभागाचे उपविभागी अधीक्षक अरुण पवार यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेले श्री खंडागळे यांची कसून चौकशी सुरू आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.









