सबऑर्बिटल फ्लाइट्सची सेवा लवकरच
जगातील पहिले सुपरसॉनिक कमर्शियल विमान कॉनकार्ड हे ध्वनिपेक्षा दुप्पट वेग गाठणारे हेते. या विमानातून केवळ 3 तासांमध्ये न्यूयॉर्कहून लंडनमध्ये जाता येणार होते. याचा कमाल वेग 2172 किलोमीटर प्रतितास इतका होता. परंतु याचा देखभालीचा खर्च अधिक असल्याने त्याचा वापर करणे अवघड ठरल होते. अशा स्थितीत 2000 साली एक हायप्रोफाइल दुर्घटना घडली अन् याचे संचालन रोखण्यात आले. आता सुमारे 20 वर्षांनी याच धर्तीवर एक नवे वेगवान विमान दाखल होणार आहे. याला नासाने एक्स-59 नाव दिले आहे. तर ब्रिटिश एव्हिएशन एक्स्पर्ट एका अशा विमानाची कल्पना करत आहेत, जे 2 तासांपेक्षा कमी कालावधीत जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचवू शकेल. याचा वेग चकित करणारा असणार आहे.
नासाने सुपरसोनिक विमान एक्स-59 ला सन ऑफ कॉनकार्ड म्हटले जातेय. लवकरच हे विमान स्वत:चे पहिले उ•ाण करणार आहे. कॉनकार्डच्या तुलनेत छोटे, कमी वेगाचे अन् सुमारे 1500 किलोमीटर प्रतितासाचा वेग असणारे हे विमान न्यूयॉर्क ते लंडनसाठीचा प्रवासाचा कालावधी 3.30 तासांनी कमी करणार आहे.

तर ब्रिटनच्या नागरी उ•ाण प्राधिकरणाने स्वत:च्या अहवालात प्रवासाचा वेग अनेक पटीने वाढविणारे प्रयोग केले जात असल्याची माहिती दिली आहे. लंडनहून सिडनीपर्यंत 2 तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचता येणार आहे. सध्या लंडनहून सिडनी येथे जाण्यासाठी 22 तासांचा कालावधी लागतो. तज्ञांनी याचे नाव सध्या सबऑर्बिटल फ्लाइट्स ठेवले आहे.
5632 किमी प्रतितास इतका वेग
सबऑर्बिटल फ्लाइट्स हे 3500 मैल म्हणजेच 5632 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने उ•ाण करू शकणार आहे. म्हणजेच न्यूयॉर्क ते शांघायपर्यंतचे अंतर केवळ 39 मिनिटांत कापता येणार आहे. सध्या या प्रवासासाठी 15 तास लागतात. न्यूयॉर्कहून लंडनसाठीचा प्रवासही एक तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येईल. सबऑर्बिटल फ्लाइट्स 2 तासांच्या आत पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचू शकते असा अनुमान अहे.
एलन मस्क उतरले मैदानात
एलन मस्क आणि अन्य उद्योजक अंतराळ पर्यटनाच्या पुढे जात सुपरसोनिक फ्लाइट्सच्या क्षेत्रात काम करत आहेत. 2020 मध्ये स्पेसएक्सने स्वत:च्या स्टारशिप रॉकेटच्या योजनेचा खुलासा केला होता. हे विमान एक तासापेक्षा कमी वेळेत 100 प्रवाशांना एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत नेण्यास सक्षम असल्याचे तेव्हा म्हटले गेले होते. अलिकडेच चिनी कंपनी स्पेस ट्रान्सपोर्टेशनने स्वत:च्या पंखयुक्त रॉकेटच्या परीक्षणाची घोषणा केली आहे. याचे पहिले उ•ाण 2024 आणि पुढील वर्षी चालकदलासोबत होणार आहे.









