कोल्हापूर :
शहरवासीयांची रस्त्यावरील वाहतुक सोपी व्हावी, ताण कमी व्हावा, रस्ते रिकामे व्हावेत याउद्देशाने सुरु असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा मुळ उद्देश सफल होताना दिसत नाही. महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक झोपेचं सोंग घेत आहे. चिरीमिरी घेवून या दुकानदारांना परवानगी दिली जात असल्याचे बोलले जाते. कुणीही या व अन् फुथपाथवर दुकान थाटाव या प्रवृत्तीला पायबंद घालावा. अतिक्रमण विरोधी कारवाईची व्याप्ती स्वरुप बदलण्याची गरज व्यक्त आहे.
शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांत तब्बल 100 किलोमिटर इतके फुटपाथ (पदपथ) बांधण्यात आले. याशिवाय शहरात अस्तित्वात असणारे 80 किलोमिटरचे फुटपाथ आहेत. या सर्व 180 किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथचा वापर अवैध मार्गाने दुकानदारी थाटण्यासाठी सुरु आहे. फुटपाथचा वापर करुन पादच्रायांचा प्रवास सुरक्षित व्हावा, जेणे करुन रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल या उद्देशाला हरताळ फासली जात आहे.
शहर विकास आराखड्यानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांची लांबी 129 किलोमिटर इतकी आहे. ही अंदाजे एक लाख 29 हजार 964 मीटर इतकी आहे. या सर्व प्रमुख रस्त्यांना जोडण्यासाठी शहरात 324 चौक आहेत. 2009पासून शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत 49.50 किलोमिटरचे रस्ते बांधणी झाली. याप्रकल्पांर्गत तब्बल 100 किमी रत्यांच्या दुतर्फा पदपथ बांधण्यात आले. तर 108 कोटी रुपये खर्चून 39 किलोमिटरची रस्ते बांधणी महापालिकेने नगरोत्थान योजनेतून केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा 80 किमी फुटपाथ निर्माण झाले. शहरात सुमारे 180 किलोमिटर दुतर्फा फुथपाथ आहेत. मात्र, गर्दीच्या व व्याप्रायाच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी असलेल्या बहुतांश फुथपाथवर दुकाने थाटण्यात आली आहेत.
शहरातील वाढत्या रहदारीचा ताण रस्त्यावर पर्यायाने सार्वजानिक वाहतुकीवर पडत आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, वाहतुक सुरळीत होण्याबरोबरच नागरिकांना सहज व सुरक्षितपणे शहरातून पायी चालता यावे. यासाठी फुटपाथची निर्मिती केली. मात्र फुटपाथ विक्रेत्यांनी व्यापल्याने रस्त्यावरील ताण वाढत आहे. फुटपाथवर थाटलेली दुकाने कायमची हटविण्यासाठी ठोस कारवाईची मागणी होत आहे.
- मालकी हक्क
शहरातील फुटपाथ ही दुकानदारांची मत्तेदारी बनली आहे. उपनगरातील काही मोजके रस्ते सोडल्यास सलग दोनशे फुटही फुटपाथवरुन चालता येत नाही. अनेक दुकानदारांनी दारातील जागा भाड्याने दिली आहे. तर उच्चभ्रू वस्तीत बंगल्याच्या बाहेर असलेल्या जागेत फळ विक्री पासून अगदी फर्निचर विक्रीपर्यंतची दुकाने आढळतात. बंगल्याच्या दारात सरकारी रस्त्यावर गाडी लावळ्यास अंगावर येणारा हा वर्ग कंपौंडला घासून दुकान धाटण्यास परवानगी देतो कसा हे उघड गुपीत आहे. शहराची सार्वजानिक मालमत्ता असलेली फुटपाथ मालकी हक्क म्हणून वापरली जात आहेत. महापालिकेने व्यापक मोहीम उघडली आहेच, या जोडीला एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या जागी तेच दुकान थाटल्याचे आढळल्यास फौजदारीसह इतर कारवाई करणे आवश्यक आहे. ही फुटपाथ रिकामी करून सार्वजानिक वाहतूक व रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.








