अनुष्का शेट्टी आणि नवीन पॉलीशेट्टी यांचा आगामी चित्रपट ‘मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी’च्या निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर जारी केला आहे. अनेकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यावर आता हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एका शेफची भेट एका स्टँडअप कॉमेडियनसोबत झाल्यावर काय घडते हे या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

चित्रपटात शेफच्या भूमिकेत अनुष्का शेट्टी दिसून येणार आहे. तर स्टँडअप कॉमेडियनची भूमिका नवीन पॉलीशेट्टी साकारत आहे. चित्रपटात अनुष्काची व्यक्तिरेखा ही नारीवादी असून तिला विवाह करण्याची इच्छा नसते. तसेच ती प्रेमातही पडण्यास तयार नसते. तर स्टँडअप कॉमेडियन सिद्धू हा एका प्रतिबद्ध नात्याच्या शोधात असतो आणि जीवनात स्थिर होण्याची त्याची इच्छा असते. ट्रेलर दोन्ही व्यक्तिरेखांच्या विविध दृष्टीकोनांवर प्रकाश टाकतो अणि जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये असूनही त्यांच्यामधील संबंधांविषयी महत्त्वाचे पैलू उघड करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर मनोरंजक कहाणी लोकांपर्यंत पोहोचविण्याची हमी देणारा आहे. अनुष्का अन् नवीन या दोघांनीही या चित्रपटात उत्तम अभिनय केल्याचे मानले जात आहे.









