आचरा | प्रतिनिधी
उबाठा आचरा महिला आघाडी प्रमुख तसेच ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर आणि त्यांचे पती प्रशांत गांवकर यांनी भाजपामधे पक्ष प्रवेश केला. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश घेण्यात आला. आचरा विभागातील वैभव नाईक यांचे विश्वासू खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती. ऐन जिल्हा, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अनुष्का गावकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे.या प्रवेशावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, मिताली कोरगावकर महेश मांजरेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, विजय निकम, सुमित सावंत, सतीश वाईरकर, बंडू गावडे, देवेंद्र हडकर, जीवन भोगावकर, सुशील गावडे, संतोष गावकर, संजय लोके, मंदार सरजोशी हे उपस्थित होते. पक्ष वाढीसाठी आपण ताकतीने भाजपा साठी काम करणार असे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.









