वृत्तसंस्था / हॉफजीस्मर (जर्मनी)
येथे झालेल्या हॉफजीस्मर खुल्या अश्वदौड स्पर्धेत भारताचा 26 वर्षीय घोडेस्वार अनुष अगरवालने ड्रेसेज प्रकारात विजेतेपद मिळविले. या क्रीडा प्रकारातील अनुषचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
यापूर्वी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अनुष अगरवालने अश्वदौड प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. जर्मनीतील स्पर्धेत त्याने 69.891 टक्केवारी गुण नोंदवित अंतिम सहा स्पर्धकांमध्ये आघाडीचे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात पिया पिट्रोव्हेस्कीने दुसरे तर कॅथरिना हेमरने तिसरे स्थान मिळविले.









