वृत्तसंस्था / नवी दिल्ली
15 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या आयटीएफ पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या अनुराग अगरवालला पात्र फेरीच्या पहिल्याच सामन्यात दीप मुनीमकडून पराभव पत्करावा लागला. . दीप मुनीमने अगरवालचा 7-6 (8-6), 7-5 असा पराभव केला. पात्र फेरीमध्ये भारताच्या दलविंदरसिंग, भूषण हेओबाम, द्रोणा वालिया, सुरज प्रबोध, अर्जुन राठी यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे. पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये ब्रिटनच्या जय क्लार्कला टॉपसिडींग देण्यात आले आहे.









