वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युवा अश्वदौडवीर अनुपती नव्याश्री साई व राजू सिंग यांनी येथे झालेल्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय अश्वदौड चॅम्पियनशिपमध्ये शो जंपिंग व ड्रेसेज या प्रकारात विजेते ठरले आहेत.
युवा रायडर विभागात अनुपतीने शो जंपिंगच्या दोन टप्प्यात एकही पेनल्टी न घेता 32.60 गुण मिळविले. अविक भाटिया, गीतिका तिक्कीशेट्टी व मोनू कुमार यांना मागे टाकत अनुपती सर्वोत्तम रायडर ठरली. ड्रेसेज फ्रीस्टाईलमध्ये राजूने सर्वोत्तम कामगिरी करीत 65.18 गुण नोंदवले. जवीर वर्मा, गीतिका व नव्याश्री यांनी त्याला कडवा प्रतिकार केला. या स्पर्धेचा दुसरा टप्पा 29 डिसेंबरला होणार आहे.









